अर्थकारण

Budget 2022 Live:

Budget 2022: शालेय विद्यार्थ्यांचं ऑनलाइन शिक्षण होणार आणखी सोपं; अर्थसंकल्पातल्या ‘या’ आहेत दिलासादायक तरतुदी

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झालं आहे. मात्र या शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत आहेत. इंटरनेट, रेंज, स्मार्ट फोन्स नाहीत, अशा अनेक समस्यांमुळे बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-विद्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एक क्लास, एक टीव्ही चॅनेल या मोहिमेचा विस्तार आता करण्यात आला आहे. पूर्वी या मोहिमेअंतर्गत पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक असे १२ टीव्ही चॅनेल्स सुरू करण्यात आले होते. मात्र आता त्यांची संख्या १०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येऊ शकेल. ज्याचा जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी लाभ घेऊ शकतील.

आरबीआयचं डिजिटल चलन येणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2022 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल; बजेटआधी कॅबिनेट बैठकीला सुरुवात

अर्थसंकल्प शेतकऱ्यांसहित सर्व क्षेत्रांसाठी फायदेशीर असेल – केंद्रीय अर्थराज्यमंत्री

Budget 2022 Live: Updates, FM Nirmala Sitharaman Live from Parliament

निर्मला सीतारामन संसदेत दाखल; काही वेळातच सादर होणार अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल (२०२१-२२) सादर केला. यावेळी करोना संकटामुळे दोलायमान झालेली देशाची अर्थव्यवस्था करोनापूर्व पातळीवर आली असून, ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत होऊ लागली आहे, त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर ८ ते ८.५ टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला.

दरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यस्थेला या अर्थसंकल्पामुळे गती मिळेल अशी आशा आहे.

निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment