पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळत केला निषेध

सोलापूर – महाराष्ट्र कर्नाटक सिमवादमुळे सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण होत चालले आहे. कन्नड रक्षक वैदिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा दहन करण्यात आला आहे. त्याविरोधात सोलापुरातील बाळासाहेबांची शिवसेने मधील युवा सैनिकांनी चार पुतळा परिसरात बसवराज बोम्मई यांचा पुतळा दहन करून निषेध करण्यात आला. अत्यंत गोपनीय अशा पद्धतीने हे आंदोलन पार पडले कारण याची पूर्वकल्पना पोलिसांना मिळाली असती तर हे आंदोलन झालेच नसते.

एकनाथ शिंदे समर्थकांचा कर्नाटक सरकारला प्रतिउत्तर-
कन्नड रक्षण वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच पुतळा दहन करून निषेध केला होता. याला प्रत्युत्तर देत बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सैनिकांनी सोलापूर शहरातील चार पुतळा परिसरात शुक्रवारी दुपारी बसवराज बोम्मई यांचा पुतळा दहन केला.

अन्यथा कर्नाटक राज्यात जाऊन बसवराज बोम्मईचा पुतळा दहन करणार-
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा न्यायालयात प्रलंबित असताना कन्नड रक्षण वैदिक संघटनेच्या वतीने सीमावाद पेटवला जात आहे. एका दहशतवादी संघटनेप्रमाणे कन्नड रक्षण वैदिक संघटना काम करत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर शितोळे यांनी केला आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही आज बोम्मईचा पुतळा दहन केला आहे. पुढे भविष्यात कर्नाटकमध्ये जाऊन बसवराज बोम्मईचा पुतळा दहन करू असा इशारा दिला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment