पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी महाराजांचा अवमान पुणे बंदला व्यापारी संघटनांचा पाठिंबा

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारंवार राज्यपाल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या अवमान प्रकरणी 13 डिसेंम्बरला पुणे बंदची हक्क भाजप वगळता सर्व पक्षी संघटना केली आहे. या बंदला आता व्यापारी संघटनांनी पण पाठिंबा देत छत्रपतींच्या अवमानाचा निषेध करणार आहे.

आज संभाजी बिग्रेड,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,आर.पी.आए.ई . भाजप वगळता सर्व पक्षिय पदाधिकाऱ्यानी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट दिली. या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना, ” छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले. आत नवी आदर्श नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत. ” अस व्यक्तव्या करून राज्यात संतापाची लाट पसरवली होती. तसेच ” भाजपचे आमदार मंगल प्रभात लोडा यांनी एकानाथ शिंदेच्या बंडला आग्रचे सुटकेची तुलना करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. ” हे प्रकरण हितेच थांबले नसून भाजपचे दुसरे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म स्थळ बदलत महाराजांचा जन्म कोकणात झाला असे व्यक्तव्या केलं होत. वारंवार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान प्रकरणी संभाजी ब्रिगेड व भाजप वगळता सर्व पक्षीयने पुणे बंदची हक्क दिली आहे. आणि या बंदला पाठींबा आता व्यापारी ही देणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याना पदमुक्त करून महाराष्ट्रातून हक्कल पट्टी करव्ही, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाही व्हावी यासाठी हा बंद करून निषेध करणार येणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment