विदर्भ

पदवीधर निवडणुकीत ‘मविआ’ उमेदवारांवरून कन्फ्युज तर भाजपने आखली ही स्टेटजी

अमरावती – पदवीधर निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज आज ११जानेवारी रोजी भरणारा आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अजूनही उमेदवारावरून कन्फ्युजन असल्याचे दिसून येत आहे. अशातच शिंदे फडणवीस सरकारमधील घटक पक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांनी या निवडणुकीत आपणही पाच उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.

मविआ पक्ष श्रेष्ठीची मुंबईत होणारी बैठक अद्याप झाली नसून त्यामुळे मविआबद्दल बोलायचे झाल्यास या मतदारसंघाबाबत ना पक्ष ठरला ना उमेदवार अशी मविआची स्थिती आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाउ पटोले हे यांनी ९ जानेवारीला अमरावतीत घेउन काँगेस पदाधिकारी सोबत बैठक केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना नाना पटोले म्हणाले की आम्ही सध्या सात नावांवर विचार करतो आहे त्यापैकी सक्षम उमेदवार देऊ आणि त्यालाच निवडून आणू.

येत्या ३० जानेवारीला राज्यातील ५ मतदारसंघात विधान परिषदेच्या जागासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाने कोणता मतदारसंघ लढावा, हे मविआचे राज्यस्तरीय नेते आपसात ठरवणार होते. त्यासाठीची बैठक मुंबईत होणार माहिती आहे. असल्याचे तिन्ही पक्षाच्या स्थानिक प्रदेश पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगीतले सांगितले होते. माञ अद्याप ही बैठक झाली नाही.

शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी पाच उमेदवार देत शिंदे सरकार मध्ये असूनही नाराज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. राणा आणि बच्चू कडू च्या वादानंतर सुद्धा बच्चू कडू यांनी कठोर भूमिका घेत आम्ही बाहेर पडू अशी धमकी सरकारला दिली होती मात्र काही तासातच त्यांनी न्यूटन घेत मंत्री पदाच्या आशेने सरकारसोबत राहणे पसंत केले त्यानंतरही मंत्रीपद न मिळाल्याने बच्चू कडू यांनी पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम सादर पुन्हा एकदा सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघ गेल्यावेळी काँग्रेसने लढवला होता. त्यामुळे यावेळीही या पक्षाने दावा केला आहे. परंतु पाच मतदारसंघ व काँग्रेस, या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. काँग्रेसने विधान परिषद या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मिलींद चिमोटे यांच्या खांद्यावर मुख्य समन्वयकाची जबाबदारी दिली असून सोमवारी नेमकी बैठक कोठे होणार, हे अद्याप कळले नाही. परंतु प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानासोबतच विधान परिषद निवडणुकीची चर्चाही त्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment