विदर्भ

सन्मान आणि अभिमानाने साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांचे आवाहन

नांदगांव पेठ/प्रतिनिधी

१५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले आपल्या देशाला एक गौरवशाली इतिहास लाभला असून आज आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने देशाचा हा सन्मान आणि अभिमान कायम ठेवत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साह आणि आनंदाने साजरा करावा असे आवाहन प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांनी श्रीरामचंद्र संस्थान येथील हर घर तिरंगा अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत देशभर साजरा होत आहे. शासनाच्या वतीने हा राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान देखील चालवले जात असून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज देखील फडकविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असणाऱ्या येथील श्रीरामचंद्र संस्थानच्या वतीने सुद्धा हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देण्यासाठी घरोघरी निःशुल्क राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले. याप्रसंगी गावातील अनेक मान्यवर मंडळींची कार्यक्रमस्थळी उपस्थिती होती.

  प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या वतीने नागरिकांना राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले. तसेच प्रत्येकांनी हा राष्ट्रध्वज आपल्या घरावर लावण्यासाठी आवाहन केले.सामायिक राष्ट्रगाणं ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment