अकोला- जिल्ह्यातील महान येथील बाल शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कुलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये फनी गेम्स,खाऊं, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मौज मजा,मस्ती धमाल करण्यात आली. २ जानेवारी रोजी बाल शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल महान येथे बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला.चिमुकल्या विध्यार्थ्यांना एक वेगळा आणि नाविन्यपुर्ण अनुभव देण्यासाठी विरंगुळा म्हणुन प्रत्यक्ष क्रूतितून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देऊण मुलांचा सर्वांगिक विकास होण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन बार्शिटाकळी पं.स.चे सदस्य किशोर देशपांडे व केंद्र प्रमुख पिंपळकर, मुख्याध्यापिका सपना सुपनेर यांच्या हस्ते करण्यात आले.
बाल आनंद मेळाव्यात मुलांसाठी वेगवेगळे फनी गेम्स,खाऊचे ६५ स्टॉल्स लावण्यात आले होते. आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी अतिशय उत्साहाने खुप छान छान चविष्ट चटकदार खाद्य पदार्थ बनून आनले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची खरेदी विक्री करत विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध पदार्थाचा आस्वाद घेत आनंद लुटला तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुण या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भरभरुण कौतुक केले. या मेळाव्याला माता पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊण स्कुलच्या उपक्रमाचे कौतुक केले आनंद मेळाव्यासाठी सर्वे शिक्षक व्रुंदांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन लुले , यांनी केले व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष किशोर ठाकरे यांनी केले आभार प्रदर्शन भळ यांनी केले