कोंकण महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली सात लाख रुपयांची  फसवणूक

रत्नागिरी – वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बहाण्याने रत्नागिरी येथील पालकांची ठाण्यातील संशयित एज्युकेशनच्या मालकाने तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना 13 जून 2018 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. एज्युकेशन ओव्हरसिज कंन्सल्टन्सीचा मालक सागर साळवी (रा. नौपाडा ठाणे) असे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात जगन्नाथ रमाकांत जुवळेकर (53, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,जगन्नाथ जुवळेकर यांच्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यासाठी त्यांनी ठाणे येथील एज्युकेशन ओव्हरसिज कंन्सल्टन्सीचा मालक सागर साळवीच्या खात्यात 6 वर्षांची 18 लाख रुपये फी जमा केली. परंतु सागर साळवीने त्यातील फक्त अडीच वर्षांची फी वैद्यकीय कॉलेजला भरून उर्वरित 7 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत जुवळेकर यांनी सागर साळवीला फोनद्वारे वारंवार विचारणा केली पण सागरने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

याप्रकरणी जुवळेकर यांनी ठाणे येथील सागरच्या ऑफिसला गेले असता तेही बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment