पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांना याना धर्मवीर न म्हणणं हा त्यांच्या अन्याय आहे

पुणे – राज्यात काही दिवसांपाडून छत्रपती संभाजी महाराज यांना कोणती उपमा द्यावी यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष मोठा वाद रंगला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात बोलत बोले.. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज रक्षक होते, ते धर्मवीर न्हवते मात्र त्या नंतर अजित पवारांवर सतंत्रधारी नेते तुटून पडले टीकेची झोड उमटू लागली.. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष मध्ये आरोपच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. मात्र विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या केलेल्या व्यक्तव्यावर आपण थांब आहोत अशी भूमिका मांडल्या नंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या नूतन वास्तूचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले…

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणायला कोणाचीही हरकत नाहीच..! ते स्वराज्य रक्षकच आहे. पण ते धर्मवीर नाही ?अस म्हणणं हा एक प्रकारे संभाजी महाराज यांच्या विचारांचं द्रोह आहे. आणि संभाजी महाराज यांच्यावर अन्याय करणारा आहे. खऱ्या अर्थाने देव देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज लढले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर या राज्यात हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीरच आहे. आणि त्यांना धर्मवीर नाही म्हणणं हे त्यांच्या विचारांचा द्रोह आहे. अस यावेळी फडणवीस म्हणाले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment