पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन

बालनाट्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाची कसोटी…प्रदीप गबाले

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा, कोल्हापूर-सांगली विभागीय केंद्रावर , मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी ठीक साडेनऊ वाजता नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यावेळी माजी प्राचार्य व बालनाट्य दिग्दर्शक प्रदीप गबाले तसेच म.ल.ग. हायस्कूलच्या शिक्षिका व बालनाट्य दिग्दर्शिका विशाखा जितकर यांचा सन्मान अनुक्रमे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी आणि कार्यवाह गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कारास उत्तर देताना प्रदीप गबाले यांनी बालकलाकारांना तसेच बालनाट्य दिग्दर्शक आणि पालक यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की “बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटक हे माध्यम अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतं. अर्थात संस्कारक्षम नाटकातूनच उत्तम अशा पिढी घडते. चांगलं पेरलं तरच चांगलं उगवणार हे नक्की…”

यानंतर विशाखा जितकर यांनी ” तसेच सामाजिक प्रश्नांना संस्कारी मार्गानेच योग्य उत्तर मिळू शकतात आणि बालकांना आपण अशा पद्धतीनेच मार्गदर्शन करायला हवे” असे मनोगत व्यक्त केले. बालनाट्य स्पर्धेचे परीक्षक अरविंद बेलवलकर सुजाता मोरे आणि सुरेश बारसे यांचे नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते शाल व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.

स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गुरुकुल प्राथमिक विद्यालय पेठ वडगाव यांचे “एलियन्स द ग्रेट” या बालनाट्याने स्पर्धेचा पडदा उघडला. भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आहे की जिच्याबद्दल परकियांना देखील आकर्षण आहे हे “गुडमा कायलो यो” या पात्राद्वारे या बालनाट्यात सांगण्यात आले आहे आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे हा संदेश या बालनाट्यातून देण्यात आला. या नंतर ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल पेठ वडगाव यांचे “भुताचा बाप” हे बालनाट्य सादर केले. बालवयातूनच मुलांना अंधश्रद्धेपासून परावृत्त केले पाहिजे. आज आपल्या देशात अशी अनेक गावे आहेत जिथे अंधश्रद्धेने आपले हात पाय पसरलेले आहेत आणि यामध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे असा संदेश दिला गेला.

या नंतर ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव यांचे “सिद्राम सुडोकू” या बालनाट्य तून आदिवासी भागातील शहरात आलेल्या मुलांची होत असलेली हेळसांड तगमग या बालनाट्य दिसून येते निसर्गाची काळजी का घ्यावी आणि कशी घ्यावी आजच्या काळात झाडांचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला निसर्गाचे जतन करणे हे महत्त्वपूर्ण आहे असा संदेश देण्यात आला. या नंतर आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव यांचे “हरित ऊर्जेच्या दिशेने” या बालनाट्या द्वारे आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी अशी आहेत की जिथे आधुनिक साधन उपलब्ध नाहीत.

त्या गावांमध्ये परिवर्तन अपेक्षित आहे, पण, परिवर्तन घडवताना हरित ऊर्जा किती महत्त्वाची आहे हा संदेश या बालनाट्याद्वारे दिला गेला. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी बालनाट्य पाहण्यासाठी उपस्थित होते. कोल्हापूर सांगली या विभागीय केंद्रावर एकूण ४१ बालनाट्य सादर होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळजवळ सातशे बालकलाकार बालनाट्या द्वारे रंगमंचावर आपली कला सादर करतील. अशी माहिती कोल्हापूर विभागाचे बालनाट्य स्पर्धा समन्वयक प्रशांत जोशी यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment