मराठवाडा

चिमुकलीवर बलात्कार आरोपी गजाआड

उस्मानाबाद – शहरात धक्कादायक घटणा घडली आहे. शहरातील एका 4 वर्षे 3 महिने वय असलेल्या मुलीवर 13 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे, शेजाऱ्याच्या घरात खेळण्यासाठी गेलेल्या मुलींवर अल्पवयीन आरोपीने बलात्कार केला आहे.

पीडित मुलीने घरच्यांना हि घटना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तात्काळ अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शहरात घडलेली या अल्पवयीन मुलावर पोक्सो अर्थात लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (प्रोटेक्शन ऑफ चिल्डरेंन फ्रॉम सेक्सयूल ऑफेन्स ) अंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले. तसेच गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलाचीही वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक कल्याणजी घेटे यांनी सांगितले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment