कोंकण

चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे,

चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे,
राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का
छाया रवींद्र तारू यांच्या प्रयत्नाला यश,


रोहा : रविंद्र कान्हेकर


जसजशा जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका जवळ येत आहेत. तसतसे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

आठवड्या भरापासून तालुक्यात राजकीय भूकंप वेगाने होताना दिसते. चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीच्या छाया महेश वाघमारे बहुमताने निवडून आल्या. चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायतीमध्ये  माजी सरपंच मंजुला दिपक काटकर या  26 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेतून थेट सरपंच म्हणून अनुसूचित जमातीच्या आरक्षणाखाली निवडणूक लढून बिनविरोध निवडून आल्या होत्या. तद्नंतर 26 जानेवारी 2019 रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांना दोन अपत्य होते.

मात्र 10 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना तिसरे आपत्य झाल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांनी पदावर राहणे चुकीचे असताना त्यांनी आपल्या पदाचा स्वतः राजीनामा दिला नाही. याबाबत चिंचवली तर्फे आतोने विभागातील कार्यकर्ते रविंद्र तारू यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच छाया रविंद्र तारू यांनी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. मा. न्यायालयाने दिनांक 16 जुलै 2019 रोजी अर्जदार छाया रवींद्र तारू यांच्या बाजूने निकाल दिला.

यासाठी चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायतीत रविंद्र तारू किंगमेकर ठरले. या निकालाच्या वेळेस भाजपा रायगड  जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी विशेष सहकार्य केले.


त्याप्रमाणे सरपंच काटकर यांनी अप्पर आयुक्त कोकण विभाग येथील न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणीवर दावा केला. तेथेही काटकर यांच्या विरोधात न्यायालयाने  25 नोव्हेंबर 2019 रोजी निकाल छाया रविंद्र तारू यांच्या बाजूने निकाल दिला. 

परंतु निकालाची प्रत देण्यास आयुक्तांनी टाळाटाळ केल्याने सरपंचाची निवडणूक होण्यास विलंब होत होता.  राजकीय दबावाखाली ते करत असल्याचे बोलले जात होते.

परंतु शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील हे स्वतः आयुक्त कार्यालयात जाऊन त्या निकालाची प्रत 14 फेब्रुवारी 2022 रोजी आणली व ग्रामीण भागातील चिंचवली तर्फे अतोने या ग्रामपंचायतीला न्याय मिळवून दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला अपयश आल्याचे पाहायला मिळाले.


यावेळी माजी आमदार अनिल तटकरे, आ. रवीशेठ पाटील, आ.जयंत पाटील, माजी आ.पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग आणि शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, शेकाप तालुका अध्यक्ष राजेश सानप, युवानेते संदीप तटकरे, युवानेते वैकुंठ पाटील, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभागीय अध्यक्ष कुलदीप सुतार, तालुका अध्यक्ष सोफान जांभेकर, प्रवीण देशमुख, विष्णू मोरे, संदीप मोरे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तारू हे एकत्र येत स्थानिक महाविकास आघाडी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.

त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला फार मोठा धक्का या भागात बसला आहे. यापुढेही रोहा तालुका राजकारणात हेच सूत्र चालू राहणार असल्याचे चित्र दिसणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली असली तरी रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडीत पाटील, भाजपाचे आ. राविशेठ पाटील, भाजपा नेते वैकुंठ पाटील, शेकाप तालुका अध्यक्ष राजेश सानप, युवानेते संदीप तटकरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभागीय अध्यक्ष कुलदीप सुतार हे एकत्र येत सरपंचाचा पराभव केला. हे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांना आलेले अपयश आहे असे बोलले जात आहे. 

महत्वाचे म्हणजे  ग्रामपंचायतचे नऊपैकी सदस्य  लक्ष्मण एकनाथ धनावडे, छाया रवींद्र तारू, मंदा काशिनाथ शिंदे, रोशनी रोशन बारस्कर, छाया महेश वागमारे, मंगेश अमृतकर या सहा सदस्यांनी एकमताने छाया महेश वाघमारे यांना सोमवारी 11 एप्रिल रोजी झालेल्या सरपंच निवडणूक मध्ये बहुमताने सरपंच पदासाठी मतदान करून निवडून दिले.

व त्यांना सरपंच पदावर विराजमान केले. यात राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता किसन पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे चिंचवली तर्फे अतोने ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसला. यासाठी स्थानिक विकास आघाडीतील प्रमोद पार्टे, रोशन बारस्कर, संतोष शिर्के, रामदास धनावडे, यशवंत शेडगे, संजय मुसळे, प्रफुल्ल चिकणे, संजय चोरगे, राजू शिर्के, ग्रामपंचायत प्रमुख सर्व कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment