खान्देश

सिनेस्टाईल ने गांजा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश

धुळे – तालुक्यातील सोनगीर टोल नाक्यावर गस्ती पथकाला आज पहाटे ५ वाजता एका स्विफ्ट कारचा संशय आला. वाहनचालकाला वाहन थांबविण्याची सूचना करुनही तो सुसाट वेगाने पळाला. सोनगीर पोलिसांनी शिताफिने सिनेस्टाईल त्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. तेव्हा भेदरलेल्या वाहनचालकाने कार सरवड फाट्यावर सोडून पोबारा केला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यातून तब्बल ९ लाख ५६ हजार ४८० रूपयांचा ओला गांजा मिळून आला. या कारवाईत तब्बल १४.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.

यासंदर्भात अधिक अशी की, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास सोनगीर टोल नाक्याजवळ गस्ती पथकाला संशय आल्याने त्यांनी स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.०५/एएस ०४२५) ला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार सरवड गावाच्या दिशेने वेगात नेली. दरम्यान, पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र चालक कार रस्त्याच्या कडेला लावून पसार झाला. यावेळी कारची तपासणी केली असता या कारमधून ११९.५६० कि.ग्रॅम वजनाचा ओला गांजाची पाकिटे आढळून आली.

पंचनामा ची कारवाई पूर्ण झाल्यानंतर तब्बल ९ लाख ५६ हजार ४८० मिळून आला तसेच ५ लाख रुपयांच्या कारसह ओलसर गांजा मिळून एकूण १४ लाख ५६ हजार ४८० रूपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड मिळून आले. त्यावर ज्ञानेश्वर सुकदेव मोहिते (२८) रा. भानास शिवार अहमदनगर असे असल्याचे समजुन आले. ही कारवाई सोनगिरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment