देश-विदेश

उत्तर भारतीयांवर थंडीचा कहर

नवी दिल्ली – निसर्गाचे वातावरणचक्रा मध्ये बदल झाला असून याचा प्रत्येय आपण यावर्षी अतिवृष्टीचा सामना करीत सर्वानी घेतला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून महाराष्ट्रसह संपूर्ण देशभर थंडीची लाट आली असून ,उत्तर भारतात मात्र अतिथंडीने कहरच केला आहे. तापमानात अचानक बदल झाला असून रात्रीचे तापमान ३.२ अशावर पोहचले आहे. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकामध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले असून ब्रेन स्ट्रोक मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. ह्रदय विकाराच्या समस्या घेऊन अनेक नागरिक रुग्णालयात दाखल होत आहे. काही रुग्णांचा यामध्ये मृत्यू सुद्धा झाला आहे. हीच थंडीची लाट महाराष्ट्रात वाहत असून नागरिकांनी वेळीच सावध होऊन थंडीपासून आपले आरोग्य जपावे हीच शिकावंन उत्तर भारतातील थंडी आणि नागरिक देऊन जाते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment