पुणे – पुण्यात होणाऱ्या G-२० परिषद च्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगली आहे. पुण्यात धुमाकुस घालणाऱ्या कोयत्या गॅंगला आळा घालण्यासाठी पुण्यात कोंबिंग ऑपरेशन राभवल जाते. आता पर्यंत नवीन वर्षात पुण्यातल्या ७० छोटे मोठे गुन्हेगारांकडून १८३ कोयते जप्त केलं आहेत.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये कोयता गँग कडून दहशत माजवली जात आहे. या विरोधात पुणे पोलीस ॲक्शन मोडमधे आली असून गुन्हे शाखेकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. शहरात आत्ता पर्यंत ज्या ज्या गुन्हेगारांनी कोयते घेऊन दहशत तसेच गुन्हे केले आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून आत्तापर्यंत जवळपास या ऑपरेशन मध्ये १८५ कोयते हस्तगत करण्यात आले आहे. आणि एकूण ७२ गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे.
कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. त्याच्यासोबत दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतच कोयता गॅंगविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्याच्याकडून नऊ कोयते जप्त केले. कोयता गॅंगचे सगळे मेंबर रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर कारवाही करत त्याना ताब्यात घेतलं आहे. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोयता गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांचं धाडसत्र सुरुच आहे. मागील दोन दिवस पुणे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यात रात्रभर पोलीस शहरातील विविध भागाची झाडाझडती करत आहेत. काल रात्रभरात ३२ जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून ३८ कोयते जप्त केले. रोजगारासाठी बाहेरून अनेक जण पुण्यामध्ये येत असतात त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असं पोलीस उपायुक्त सांगतात.
काल रात्री युनिट-२ कडून स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुलटेकडी पुणे येथे गस्त करीत असताना गोपनिय बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनल च्या बाजुला एक इसम थांबलेले असुन त्याचेकडील बारदाना पिशवीमध्ये लोखंडी कोयते आहेत. या बातमीच्या अनुषंगाने युनिट-२ कडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार खाजगी वाहनांवरुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून गुप्तपणे पहाणी करीत असताना मिळालेल्या बातमीतील इसम डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनल च्या बाजुला थांबलेला दिसला पोलिसांनी त्यास पकडून ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अक्षय अप्पाशा कांबळे वय २७ वर्ष रा. स नं ४२९ / ३० डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे जवळ किमत ४,५००/- रु चे एकुण ०९ नग लोखड़ी कोयते मिळून आले असुन त्याचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १४/२०२३ आर्म अॅक्ट कलम ४ (२५). महा. पोलीस अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करत आहे.