मनोरंजन

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिच्याकडे आहे हा खजिना

एखाद्या व्यक्तील कसली आवड असेल काही सांगता येत नाही. कुणाला वेगवेगळ्या प्रकारची पेनाचे कलेक्शन करायला आवडते तर कुणाला वेगवेगळ्या प्रकराची घड्याळे आवडतात. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रेया बुगडे हिला विविध रंगाचे, आकाराचे गॉगल्स जमा करण्याची प्रचंड आवड आहे. केवळ इतकेच नाही तर हे विविधरंगी गॉगल्स घालून सेल्फी काढायला देखील तिला खूप आवडते….

BY: अनुराधा कदम

कुणाला कशाचं कलेक्शन करण्याचे वेड असेल हे काही सांगता येत नाही.  त्यात कलाकार मंडळी म्हटलं की मग अशा स्टाईलबाज गोष्टी तर त्यांच्या संग्रहात असायलाच पाहिजेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्याकडे कुठल्या अॅक्सेसरीजचं कलेक्शन आहे हे जर ऐकलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल.

श्रेया कुठे फिरायला जाते तिथं अर्थातच शॉपिंग करायला निघाली किती येताना वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स ती आवर्जून खरेदी करते. तिच्या या गॉगल वेडामुळेच श्रेयाच्या कलेक्शनमध्ये  वेगवेगळ्या आकारांच्या, वेगळ्या कलरटोनच्या गॉगल्सच्या खूप व्हरायटी   आहेत.

श्रेया हे गॉगल्स ती फक्त तिच्या  कपाटाच्या ड्रॉवरमध्येच ठेवत नाही तर त्या त्या गॉगलला शोभणारा ड्रेस लूक करत फोटो काढण्याची हौसही भागवून घेते. श्रेयाच्या सोशल मीडिया पेजवर जर तुम्ही भटकंती केली तर तिच्या या गॉगल खजिन्याचा तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल.

‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून कॉमेडीची क्विन अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला गॉगल्सचं प्रचंड वेड आहे.  कुणाकडे फार तर तीन-चार गॉगल असू शकतात पण सध्या श्रेयाकडे शंभराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स आहेत जे तिने कधी कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरातून खरेदी केले आहेत.

इतकेच नव्हे तर त्यापैकी काही गॉगल्स ऑनलाईन शॉपिंग करून मागवले आहेत.  श्रेया कधीही मोबाइल बघत बसली आणि एखाद्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर जर तिला वेगळ्याच प्रकारचा गॉगल नजरेस पडला की लगेच तिचा हात ते खरेदी करण्याच्या बटनावर क्लिक होतो.

कधी एकदा तो खरेदी करते  आणि डोळ्यांवर घालून फोटो काढते असे तिला होऊन जातं. श्रेयाच्या कलेक्शनमध्ये चौकोनी, गोल या नेहमीच्या आकारासोबत हार्ट शेप , त्रिकोण , लंबगोल अशा वेगवेगळ्या  फ्रेमच्या आकाराचे गॉगल आहेत.  कलरटोन बाबत तिला जरी ब्राऊन कलर आवडत असला तरी बॉटल ग्रीन , ग्रे , ब्लॅक,  मस्टर्ड यल्लो या वेगवेगळ्या ग्लास कलरचे गॉगल्स श्रेयाच्या संग्रहात आहेत.. काही दिवसांपूर्वी श्रेयाने घातलेल्या त्रिकोणी आकाराच्या फ्रेमचा गॉगल तुफान हिट झाला होता.

तिच्या या गॉगल कलेक्शन आणि गॉगल मधल्या वेगवेगळ्या फोटोचे तिचे चाहते नेहमीच कौतुकही करत असतात आणि खूप छान कॉमेंट्सही देत असतात.


 तिच्या अनोख्या छंदाबद्दल श्रेया सांगते की, प्रत्येक व्यक्तीला गॉगल घालायला आवडत असतो आणि इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये तीन-चार गॉगल तर नक्कीच असतात. मला ही अशीच गॉगलची आवड निर्माण झाली ती उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा कुठेही जाताना आपले डोळे सुरक्षित असावेत म्हणून.

पण नंतर नंतर जेव्हा जेव्हा मी गॉगल्सची खरेदी करायला सुरुवात केली तेव्हा मला त्याच्या फ्रेम मधले वैविध्य, त्याच्या रंगीत ग्लासचे वैविध्य  आवडायला लागलं आणि आता असं झालं आहे की मी कुठेही फिरायला गेले की तिथे जेव्हा मार्केटमध्ये खरेदीला जाते तेव्हा सगळ्यात पहिली खरेदी ही माझी गॉगल्सची असते.  

माझ्याकडे जे गॉगल आहेत  त्यामध्ये काही ग्लासचा रंग वेगळा आहे व कधी कधी त्याची जी फ्रेम आहे तिच्यावर काही वर्क केलेले गॉगल माझ्याकडे आहेत. काही पांढऱ्या, गुलाबी, फ्रेमचे आहेत. जे मी नेहमी घालत नाही पण कधीतरी फंकी लूक जर मला पाहिजे असेल तर मी घालते आणि फोटो काढते.


श्रेयाचे गॉगल वेड जसे आहे तसेच तिला सेल्फी काढण्याची ही प्रचंड आवड आहे. तिच्या मैत्रिणी तिच्याबद्दल अशी गोड तक्रार करत असतात की जेव्हा श्रेया त्यांच्याबरोबर असते आणि ते धमाल करत असतात तेव्हा श्रेया  सेल्फी काढण्यात  दंग असते. आपण अनेकदा मालिकेमध्ये किंवा सिनेमांमध्ये असं सतत सेल्फी घेणारं पात्र बघत असतो तशीच  तिला प्रचंड सेल्फी काढायला खूप आवडतं.  

जे काही  बहुतांशी फोटो तिने सोशल मीडिया पेजवर शेअर केलेले आहेत  त्यामध्ये तिने काढलेल्या सेल्फीची संख्या जास्त आहे.


 श्रेयाच्या शब्दात सांगायचं तर  संग्रहात असलेल्या अनेक गॉगलपैकी सगळेच गॉगल्स ब्रँडेड किंवा खूप महाग आहेत असे नाही. तर कधीकधी स्ट्रीट शॉपिंग मध्ये खरेदी केलेलेही आहेत. इतकंच नव्हे तर अनेकदा स्टेशन परिसरातील छोटी-छोटी दुकाने असतात तर तिथेसुद्धा श्रेयाला हटके गॉगल मिळालेले आहेत.

आणि तिने ते खरेदी केलेले आहेत. त्यामुळे जरी श्रेयाच्या कलेक्शनमध्ये शंभराहून अधिक वेगळ्या प्रकारचे गॉगल्स असले तरी त्यासाठी तिने फार पैसे खर्च केले नाहीत . फक्त त्याचा कधी आकार श्रेयाला आवडतो तर कधी  रंग श्रेयाला आवडतो. कधी त्याच्यावर केलेलं कलाकुसरीचे काम श्रेयाला आवडतं आणि त्यातूनच गॉगल खरेदी करते.

शाळेत असताना खूप लाजाळू असलेली श्रेया  मोठी झाल्यानंतर प्रत्येकाची फिरकी घेणारी कॉमेडी क्वीन होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण एकदा मावशीसोबत लोकलमधून प्रवास करत असताना तिने लोकलमधल्या काही महिलांचं निरीक्षण केलं आणि घरी आल्यानंतर मावशीला त्या महिलांची हुबेहूब नक्कल करून दाखवली.

श्रेयाने जेव्हा ती मिमिक्री केली तेव्हा तिच्या मावशीने, तू मोठी होऊन अभिनेत्री होशील असं गमतीने म्हटलं होतं.   मावशीचे ते बोल श्रेयाने खरे करून दाखवले.  श्रेयाच्या अभिनयाची सुरुवात खरे तर गंभीर भूमिकांनी झाली पण सध्या मात्र श्रेया विनोदी अभिनयातील बापमाणूस झाली आहे. तर अशा या श्रेयाचे असंख्य चाहते आहेत . ती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल खरेदी करण्याची चाहती आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment