धुळे – आज धुळ्यात लवजीहाद विरोधात हिंदू संघटना कडून आज मोर्च्याची हाक देण्यात आलेली होती, या मोर्चादरम्यान मोर्चेकरांशी संवाद साधताना हिंदू धर्माचे प्रचारक सुरेश चव्हाणके व श्यामजी महाराज यांनी मोर्चेकर्यांशी सभेदरम्यान संवाद साधला. यावेळी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधताना श्यामजी महाराज व सुरेश चव्हाणके यांनी काही वाद निर्माण करणारी वक्तव्य देखील केले आहे.
यामध्ये ज्याप्रमाणे हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात ओढले जात आहे, त्याचप्रमाणे काही मुस्लिम तरुणी व महिलांना देखील हिंदू धर्मात येण्याची इच्छा असल्यास त्यांना हिंदू धर्मात आल्यानंतर कश्या प्रकारे फायदे होतील असे सांगताना चव्हाणके यांनी मुस्लिम तरुणी हिंदू धर्मात आल्यानंतर तिला एकापेक्षा जास्त सवती बरोबर आयुष्य काढावे लागणार नाही असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर परिवारातील सदस्यांकडून तिला सुरक्षा देखील दिली जाईल, तसेच नवऱ्याच्या संपत्तीमध्ये ती मालकीण असेल तसेच तिला हिंदू धर्मामध्ये देवी मानले जाईल असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
शाहरुख खानच्या आगामी पठाण या चित्रपटावरून देखील वाद सुरू आहे आणि त्यावर बोलताना चव्हाणके यांनी या चित्रपटातील भगवे वस्त्र परिधान करून बेशरम रंग या शब्दाचा वापर केलेले गाणे चित्रपट मधून काढण्यात आले नाही तर, हा चित्रपट देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही. त्याचबरोबर सिनेमाच्या पडद्यावर काळी शाई फेकून याचा विरोध केला जाईल असे देखील यादरम्यान बोलताना चव्हाणके यांनी स्पष्ट केले.
मोर्चेकर्यांशी संवाद साधताना श्यामजी महाराज यांनी देखील राज्यात जोपर्यंत लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगल्यास तो अपराध मानला जात नाही असे देखील विधान यावेळी श्यामजी महाराज यांनी आपल्या भाषणादरम्यान केले आहे. यामुळे या सभेदरम्यान केलेल्या विधानावरून आगामी काळात आणखीन वाद वाढण्याची शक्यता आहे.