विदर्भ

कलेक्टरची खुर्ची जप्त करा, न्यायालयाने दिले आदेश

चंद्रपूर – एखादा शेतकरी जिद्दीवर उठला तर तो काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळालं. एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांचा खुर्चीवरच संक्रात आणली. जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याची नोटीस घेऊन हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. या शेतकऱ्याचे नाव आहे मुस्तफा बोहरा.तो वरोरा तालुक्यात मोहबाळा येथील रहिवासी आहे. या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी खुर्चीवर संक्रांत आली आहे. वरोरा तालुक्यातील मोहबाळा एमआयडीसी मध्ये जमीन अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्याने कोर्टाकडून हा आदेश मिळवला. गेली सात वर्षे अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्यात शासन अपयशी ठरले आहे. याआधीही अशाच पद्धतीने कोर्ट आदेशाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याबाबत आदेश निघाला होता. मात्र न्यायालयाला भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्ती टळली होती. यावेळेस मुस्तफा बोहरा या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात रकमेसाठी ठिय्या मांडला. सुमारे नऊ लाखावर रक्कम द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह अन्य साहित्याची जप्ती करण्याचा आदेश अंमल करा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी अवगत केले. कोर्टाच्या आदेशानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment