पश्चिम महाराष्ट्र

अभिनेते महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ; माढा न्यायालयाने दिला हा आदेश

सोलापूर – महेश मांजरेकर यांना एका अपघातात आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर व कैलास सातपुते यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकरांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली असा आरोप केला जात आहे. महेश मांजरेकरांचा अपघात झालेला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाची होती. यावेळी महेश मांजरेकरांनी अरेरावी करत संस्थाचालकांविरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. सोलापुरातील कैलास सातपुते यांनी १५ जानेवारी २०२१ रोजीच यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांनी दौंड येथील न्यायालयात न्याय मागितला होता. यानंत प्रकरण माढा येथील न्यायालयात आले आणि अपघाता मधील परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार, आणि कैलास सातपुते यांची बाजू ऐकून माढा न्यायालयाने टेम्भुर्णी पोलिसांना आदेश दिला आहे, संबंधित अपघाताचा सर्व तपास करून न्यायालयाने सादर करावा.

टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते यांच्या संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की, मी(कैलास सातपुते) व महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये पुणे- सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ मागील वर्षी १५ जानेवारी २०२१ रोजी माझी गाडी हुंडाई कंपनीकॅबि वेनू होती, आणि महेश मांजरेकर यांचे आलिशान वाहन होते. एकाच दिशेने जाताना मांजरेकर मागून सुसाट आले आणि अचानकपणे ब्रेक दाबला. त्यामुळे माझे वाहन त्यांच्या वाहनाला धडकले. त्यामध्ये महेश मांजरेकर यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले होते. यावरून वादविवाद झाला. या अपघाताबाबत पोलीस स्टेशनला नोंद करू आणि पुढे जि कारवाई होईल ते बघू असे सांगितले तरीही त्यांनी मला बदनामी कारक शब्दात बोलले. याबाबतच व्हिडीओ देखील काही मिनिटांत सोशल मीडियावर वायरल झाला होता. ते व्हिडीओ पाहून मी, यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मला न्याय मिळावा यासाठी मी माढा न्यायालयात न्याय मागितला होता. गेल्या वर्षभरापासून यावर सुनावणी झाली असून माझ्या वकिलांनी कोर्टात म्हणणे सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि महेश मांजरेकरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करून टेम्भुर्णी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. त्यानुसार फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment