विदर्भ

जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

हिंगणघाट – हिंगणघाट शहरातील पोलिसांनी झांशी राणी चौकात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपिकडून विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या ७ दुचाकीसह ३ मोबाईल असा १ लाख ९३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई केल्याची माहिती दिनांक १० डिसेंबरला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील झांशी राणी चौक, येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना दोन अज्ञात चोरट्यानी दुचाकीवर मागुन येवुन एक व्यक्तीचा हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली होती. यावेळी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकप्रमुख शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतच्या परिसरात सतत माहीती काढून आरोपी व मोबाईलबाबत शोध घेतला असता सदर गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षीत बालक दोन्ही रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यांनी हिसकावुन नेल्याची माहिती वरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुली दिली असून, त्यांचे कडुन एक विवो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्याकरीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. एमएच-३४ / क्यु – ४३५८ असा ऐवज व वि.सं.बा. यांचे ताब्यातून जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास अटक केली.

आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता, त्यास जबरी चोरी करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पोलीस स्टेशन गिरड, हद्दीतील कोरा गावातुन चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षीत बालकासह जिल्हयातील व बाहेर जिल्हयातील विविध प्रकारच्या ७ मोटसायकल व २ मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन ७ मोटरसायकलसह सदर गुन्हयात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन मोबाईल असा एकूण जुमला किमत १,९३,०००/ रू. चा माल जप्त करण्यात आला.सदरची कामगीरी नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन हिंगणघाट, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे. डि. बी. पथकाचे पोलीस हवालदार शेखर डोंगरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई , निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर व पोलीस शिपाई .संतोष गिते व सायबर पोस्ट चे महाराष्ट्र पोलीस शिपाई दिनेश बोथकर यांनी केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment