कोंकण

दळण वळणाची साधने उपलब्ध झाल्यानंतर विकासाला गती मिळते:- खा.सुनिल तटकरे

रोह रेल्वे फाटक बंद समस्या सुटणार, उड्डाण पूलाचे भूमिपूजन

रविंद्र कान्हेकर, रायगड

कोकणचा विकास होण्यासाठी स्व. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नांनी कोकणात रेल्वे मंजूर करण्यात आली. तत्कालीन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुरदृष्टी ओळखत महाराष्ट्रासह कोकण रेल्वे जाणाऱ्या सर्व राज्यांनी आपापले भागभांडवल देत कोकण रेल्वे मार्ग पुर्णत्वास नेला.

त्यावेळी कोकण रेल्वे महामंडळ स्थापन होत ई.श्रीधरन या यांच्या अध्यक्षतेखाली अभियांत्रिकी विभागाला आव्हानात्मक असा हा मार्ग पुर्ण होत आज त्यामार्गावर दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंतच्या रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र ही वाढती वाहतूक रोहा तालुक्यातील नागरिकांना सतत फाटक बंद असल्यामुळे डोकेदुखी ठरत होती.राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन ए. के. जयस्वाल यांच्या कडे रोहा तालुक्यातील अष्टमी व पडम येथील या समस्येवर मार्ग निघावा यासाठी खासदार म्हणून दिल्लीत सतत बैठका घेतल्या. त्यावेळी निधीची तरतूद रेल्वेला करणे शक्य नसल्यामुळे याला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितल्या नंतर महारेल या महामंडळाची स्थापना करत राज्याचे अर्थमंत्री ना.अजित पवार यांनी प्राधान्याने अष्टमी येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्याच्या पन्नास टक्के निधी उपलब्ध केला. रेल्वे सेवा आली आता मुबंई पर्यंत जाणारी लोकलसेवा सुरू होईल. त्यादृष्टीने स्थानिकांच्या गैरसोयी दुर करत. प्रवाश्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन, उद्योग, या माध्यमातून तालुक्यातील विकासाला गती मिळणार असा विश्वास रायगड चे खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.


रोहा नागोठणे मार्गावरील अष्टमी रेल्वे क्रॉसिंग नंबर ५७ येथील उड्डाणपूल उभारणीचे भूमिपूजन त्यांचे हस्ते झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रविवार ९ जानेवारी रोजी रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भूमिपूजन प्रसंगी उपसभापती रामचंद्र सकपाळ,मधुकर पाटील, विजयराव मोरे,विनोद पाशीलकर,प. स. सदस्या राजश्री पोकळे,पिंगळसई सरपंच शारदा पाशीलकर, नगरसेवक महेंद्र गुजर,महेश कोलाटकर,आप्पा देशमुख,अनंतराव देशमुख, नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले, संदीप चोरगे, नवनीत डोलकर,नरेश देशमुख,प्रसाद देशमुख,मयूर खैरे,रवींद्र चाळके,सोपान मोहिते यांसह महारेल्वे चे पी के जयस्वाल,सचिन घुडे,आदी उपस्थित होते.


रोहे तालुक्यातील पिंगळसई, मेढा, भातसई, यशवंतखार या विभागांतील नागरिकांना त्रासदायक ठरत असलेली अष्टमी व पडम येथील वारंवार बंद होणारी रेल्वे फाटक बंद समस्या आता संपणार आहे. गेली कित्येक वर्षे असलेली ही समस्या महारेल महामंडळ उड्डाणपूल बांधून पुर्णत्वास नेणार आहे. ३१ पोल व जवळपास ९०० मिटर लांबीच्या अष्टमी येथील ५७ नंबर रेल्वे फाटक उड्डाणपूलाच्या पहिल्या टप्याचा भूमिपूजन होत होत कामाला सुरुवात झाली आहे.

नववर्षाच्या प्रारंभीच हे काम सुरु करत महाआघाडी सरकार ने रोहे तालुक्यातील नागरिकांना सदैव स्मरणात राहील अशी भेट दिली आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता सचिन घुडे यांनी करताना हा प्रकल्प कसा साकारणार याची थोडक्यात सगळ्यांना माहिती देत वर्ष दिडवर्षात कोणतेही अडथळे न आल्यास हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.


रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे आपल्या मनोगतात गेली कित्येक वर्षे नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येला खा. तटकरे यांनी पाठपुरावा करत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पुर्णत्वास नेली. आज नवर्षाच्या सुरुवातीस हे काम सुरु होत असल्याचा आनंद व्यक्त करत हे काम मुदतीत व दर्जेदार कसे होईल त्यासाठी प्रशासन व ठेकेदार यांनी प्रयत्न करावेत व यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.एकूणच रोहा नागोठणे, अलिबाग मार्गावरील प्रवासी, रोहे शहरांत येणारे ग्रामीण भागातील नागरिक, कामगारवर्ग, यांना हा प्रकल्प पुर्ण झाल्यावर मोठा दिलास मिळणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment