रत्नागिरी – कोकणात रत्नागिरी जिल्हयातील मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या किरीट सोमय्या सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या साई रीसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ अन्वये बजावण्यात आलेल्या समन्स प्रकरणी अनुपस्थितीचा विनंती अर्ज मंजूर करत दापोली न्यायालयाने माजी पालक मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. परब यांच्या वतीने त्यांचे वकील आज दापोली कोर्टात हजर झाले वकिलांनी दापोली न्यायालयात माजी पालकमंत्री अनिल परब यांना आज उपस्थित राहता येणार नाही असा विनंती अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आला आहे. दापोली न्यायालयाने माजी पालकमंत्री अनिल परबांना अनुपस्थित राहण्यास आज मुभा दिली.
मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली न्यालायलाने माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह सदानंद कदम,पुष्कर मुळ्ये या तिघांना समन्स बजावलं होते. या प्रकरणातील तीन नंबरचे आरोपी आणि सी काँच रिसॉर्टचे मालक पुष्कर मुळे आज बुधवारी १४ डिसेंबर रोजी दापोली न्यायालयात हजर .झाले. न्यायालयाने पुष्कर मुळे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.
दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर आज सुनावणी झाली. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने एड प्रसाद कुवेसकर वकील म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ जानेवारीला होणार आहे.