रत्नागिरी – दापोली तालुक्यात पावनळ करंजाळी रस्त्यावरती आढळलेल्या मृतदेह हा खूनाचा प्रकार असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. याप्रकरणी जयकिसान ओमप्रकाश सिंग याला याला पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत किशोर परब याचा खून किरकोळ वादातून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतचा मुंबई येथील मित्र संशयित जयकिसान ओमप्रकाश सिंह याला काही तासात दापोली पोलिसांनी खेड येथून एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकलेल नाही.
दोन जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सोबत आज पावडर करंजळी रस्त्यावरती एक आज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याची खबर दापोली पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली करंजाळी येथे आपल्या आजीकडे राहणाऱ्या सुशांत किशोर परब याचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल.
सुशांत किशोर परब हा अंधेरी मुंबई येथे राहणार आहे. मात्र गेले काहीवर्षे आपल्या आजीकडे दापोली तालुक्यात करंजाणी येथे राहत होता. त्याचा मित्र जयकिसन ओम प्रकाश सिंग हा गावी सुशांतला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघेही एक जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून दोघेही बाहेर पडले मात्र यावेळी रात्री उशिरा जयकिसन हा एकटाच घरी आला यावेळी आजीने सुशांत कुणीकडे आहे अशी चौकशीही केली. जयकीसन सिंग पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडून निघून गेला. खेड येथे तो असल्याचे मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी शोधून काढले. खेड येथील एका लॉजवरून जयकीसन ओमप्रकाश सिंग दापोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी काल सोमवारी दापोली पोलीस ठाण्यात काल आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, पोलिसांनी तपासास सुरुवात केल्यावर सुशांत हा त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकर वाडी येथे आजीकडे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकीसन ओमप्रकाश सिंग हा त्याला भेटायला रविवारी १ जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे आला होता, रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले, त्यानंतर जयकीसन याने सुशांतचा काटा काढला, त्याचे अंगावरील सर्व कपडे काढले व ते मृतदेहापासून सुमारे २० ते २५ फुटावर असलेल्या झाडावर अडकवून ठेवले, त्यानंतर जयकीसन सकाळी सुशांतच्या घरी आला व आजीला सांगून बाहेर पडला, सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला, सुशांत व जयकीसन हे दोघे रात्री बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांना मोबाईल कॉल च्या लोकेशवरून जयकीसन हा खेड येथे असल्याचे समजले, पोलिसांनी खेड येथील एका लॉज मधून त्याला ताब्यात घेतले, जयकीसन याला अमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले, सुशांत याचे वडील मुंबईत रहात असून आज सकाळी ते दापोलीत आल्यावर त्यांनी सुशांतचा खून झाला असल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून जयकीसन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत. याप्रकरणी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी दापोली पोलीस स्थानकात भेट देऊन पुढील तपासाचे मार्गदर्शन केले.