मराठवाडा

मॅरेथॉनमध्ये धावताना स्पर्धकाचा मृत्यू

उस्मानाबाद – शहरातील स्काऊट गाईड येथे शिपाई म्हणून कार्यरत असलेले हनुमंत केरबा पाटील (वय ५६) यांचा उस्मानाबाद स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना अचानकपणे चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी उस्मानाबाद स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेत हनुमंत पाटील यांनी सहभाग घेतला होता. ते शहरातील स्काऊट गाईड कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. अत्यंत कमी मानधनावर ते शिपाई म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी अक्षरशः इतरांच्या घरी धुणी-भांडे धुण्याचे काम करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची एक मुलगी बारावी तर दुसरी नववीच्या वर्गात शिकत आहे. त्यांच्या जाण्याने मुलींच्या भवितव्याची चिंता अधिकच वाढली आहे.

सकाळी तुळजाभवानी क्रीडा मैदान येथून निघालेल्या मॅरेथॉनमध्ये हनुमंत केरबा पाटील हे धावत होते. शहरातील पोलीस मुख्यालयाशेजारील लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखेजवळ आल्यानंतर चक्कर आल्याने खाली बसले. त्यावेळी तेथील पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली, असा परिवार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment