सांगली – जिल्हा शासकीय हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करून घरी गेल्यावर डॉक्टर नंदकिशोर गायकवाड यांना हा हृदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टर नंदकिशोर गायकवाड हे शहरातले प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा बजावत होते, आज सकाळी डॉक्टर गायकवाड हे रुग्णालयामध्ये आले होते, त्यानंतर उपचार आणि शस्त्रक्रिया करून ते नाष्टा करण्यासाठी घरी गेले होते. घरी नाष्टा करत असताना अचानकपणे त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टर गायकवाड हे अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे आणि मनमिळावू डॉक्टर म्हणून परिचित होते, स्त्री रोग तज्ञ म्हणून शासकीय रुग्णालयामध्य ते सेवा बजावत होते. तसेच वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी होती. गायकवाड यांचे वय ४६ होते, त्यांच्या या मृत्यूच्या घटनेने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.