पश्चिम महाराष्ट्र

विजेचा धक्का लागून चौघांचा जागेवरच मृत्यू

पुणे- भोर तालुक्यातील निगडे गावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावच्या बंधाऱ्यात मोटार बसवण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेचा धक्का लागून जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या चार मृतांमध्ये बाप लेकांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नीरा नदी पात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक वीज प्रवाह गायब झाला. त्यावेळी चौघेजण मोटार बसवण्यासाठी पाण्यात उतरले होते मात्र वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हे चौघेजण शेतकरी कुटुंबातील होते. त्यात बाप लेकाचा समावेश आहे. घटना स्थळावरून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे.

महावितरण मुळेच ही घटना घडली असल्याचे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केली जात असून घटनेच्या आगोदर लाइट ये – जा करत होती. मात्र विद्युत प्रवाह पाण्यात उतरला आणि या चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनास्थळी राजगड पोलिस दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. नेमकी ही घटना कधी घडली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास राजगड पोलिस करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून निगडे गाव संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment