पश्चिम महाराष्ट्र

धम्मविचार साहित्य संमेलनातुन समतावादी विचारांची पेरणी: प्राचार्य सुरेश वाघमारे

कोल्हापूर – धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनातून समतावादी विचारांची पेरणी केली जात आहे असे मत उदघाटक प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात व्यक्त केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. संजय आवटे होते.

पुढे बोलताना असे म्हणाले की, अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात परंतु सर्वांना सोबत घेऊन धम्माचा विचार पेरणी करणारे हे संमेलन वेगळे आहे. शाहूच्या भूमीत हे विचार पेरणी झाली की तो विचार वेगाने वाढला जातो. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. संजय आवटे म्हणाले, भारत ही गौतम बुद्ध यांची भूमी आहे, या देशात प्रेम, बंधुता, करुणा, अहिंसा ही मूल्य खोलपर्यंत रुजली आहेत, परंतु आज परिस्थिती बदलत आहे. राजकिय परिस्थितीमुळे सर्व प्रकारच्या अंदाधुंदी समाजात वाढताना दिसत आहे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण समतावादी विचाराने आपण जीवन जगले पाहिजे. कोल्हापूर ही समता भूमी आहे, या भूमीने जगाला समतावादी दृष्टी दिली. ही समता देशात वाढावी ही अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो.

यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून सविधान कन्या डॉ अनुप्रिया गावडे यांनी संमेलनाची सुरुवात केली. २०२३ चा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोल्हापूरचे माजी उपमहापौर मा भुपाल शेटे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विस्थापित महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या आम्ही भारतीय महिला या संघटनेला दोन लाख दहा हजार रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी भुपाल शेटे, विजया कांबळे, नंदकुमार गोंधळी, करुणा विमल यांची मनोगते झाली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वागत डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रास्ताविक करुणा विमल तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले. तीन सत्रामध्ये झालेल्या या संमेलनास माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सतीशकुमार पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाद देसाई, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, विजया कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. याच सत्रात कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन तर राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार देऊन डॉ. अनुप्रिया गावडे, रेखा चव्हाण, राजाराम कांबळे, गौरी मुसळे, शंकर पुजारी, रेखा बोर्‍हाडे, मिलिंद माने, कुमार ननावरे, राजश्री हुरकडली, निशांत गोंधळी, डॉ. उषा पाटील, उज्वला मडिलगेकर, पांडुरंग देशमुख, रवींद्र श्रावस्ती, डॉ. वैशाली पाटील, कुसुम राजमाने, सुलोचना चिंदके, उज्वला कांबळे (कोल्हापूर), सोपानराव शिंदे, रंजना सानप, हेमलता झेंडे, सुनिता जगदाळे (सातारा) छाया पाटील, शालिनी गायकवाड, संध्या सावंत (मुंबई) डॉ. संजय वाघंबर (लातूर), डॉ. किरण जगदाळे, अशोक पाचकुडवे (सोलापूर), डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. मीना सुर्वे, छायादेवी आढाव, विजयकुमार कांबळे, सुनिता कुलकर्णी, मंगल यादव, सुधीर कांबळे, शैलजा पाटील (सांगली), डॉ. अनुराधा गोल्हार (पुणे), परिमिता साने (औरंगाबाद), विभावरी मेश्राम, मोनिका तारमळे (कल्याण), डॉ. खंडू वाघमारे, प्रा. बेबीअफरोज सय्यद, (बीड), डॉ. संदीप गायकवाड (नाशिक), विजयकुमार पवार, विजया वाघमारे (नांदेड), आशा खिल्लारे (परभणी), महेश चव्हाण, संध्या खतरडे, सय्यद सलमान सै. शेरू (यवतमाळ), भक्तदास जिवतोडे (चंद्रपूर), तुळशीराम जाधव (नाशिक), शैला वाघ (अहमदनगर), जयश्री सुकाळे (उस्मानाबाद), किशोर चव्हाण (सिंधुदुर्ग), डॉ. प्रीती वाहने (धुळे), अर्चना बिरदवडे (पुणे), कैलास कावरखे (हिंगोली), शंकर अंदानी (अहमदनगर) या महाराष्ट्रातील ५८ मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.

दुसर्‍या सत्रात धम्म विचार आणि भारतीय संविधान या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, अ‍ॅड. अकबर मकानदार, निती उराडे आदी विचारवंतांनी सहभाग घेतला. तिसरे सत्रात कवी संमेलन पार पाडले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, निमंत्रित कवी रंजना सानप, वसंत भागवत, उद्धव पाटील, संघसेन जगतकर, डॉ. स्मिता गिरी, रमेश नाईक, चंद्रकांत सावंत, विद्रोही कवी पी. के., डॉ. चंद्रशेखर मुळे, आराधना गुरव, स्वप्निल गोरंबेकर, शांतीलाल कांबळे आदी मान्यवर कवी आपल्या कविता सादर केल्या. पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास कोल्हापूर सह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment