पश्चिम महाराष्ट्र

धनंजय मुंडे अडचणीत, ऑफिसमधून गेला धमकीचा फोन

पिंपरी – पिंपरी परिसरात चिखली या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या व्यवस्थापकाकडे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंढे यांच्या कार्यालयामधून बोलत असल्याची बतावणी करत शिवीगाळ करीत दमबाजी करत पैशांची मागणी केली. याप्रकरणी शुक्रवारी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिवदास साधू चिलवंत (वय ४१, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीमध्ये शिवदास चिलवंत हे व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. यावेळी त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून फोन आला. मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे. तू मूळचा उस्मानाबाद येथील राहणारा आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे असे म्हणत त्या व्यवस्थापकाला शिवीगाळ केली.

या घटनेने चिखली परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा फोन नक्की कुठंन आला आणि तो खरा आहे की नाही याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय वातावरण तापू लागले असून धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment