कोंकण महाराष्ट्र

धनरेषा अर्बन कंपनीत ९६ लाखांचा खोटाला

रत्नागिरी – कोकणात आजवर अनेक खाजगी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकार घडले आहेत. आर्थिक गुंतवणूक केल्यावर झटपट ज्यादा मिळणारी रक्कम विविध प्रलोभने दाखवून अनेकाची फसवणूक केल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील धनरेषा अर्बन निधी लि. कंपनीमध्ये तब्बल ९६ लाखांचा घोटाळा करून पोबारा केलेल्या पती-पत्नीस सोमवारी चिपळूण पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

धनरेषा अर्बन निधी लि. कंपनीमध्ये राहुल अरविंद भगत (३६), प्रियंका राहुल भगत (३३) हे पती-पत्नी कार्यरत होते. २०२० पासून खेर्डी येथे धनरेषा अर्बन निधी लि. कंपनी कार्यरत होती. या काळात कंपनीत येणार्‍या ग्राहक वर्गाला आकर्षक दामदुप्पट ठेवींसह तसेच संचालकपदी वर्णी लावतो अशी आमिष राहुल भगत व प्रियंका भगत यांनी दाखवली होती. ग्राहक आकर्षित होताच संधीचा फायदा घेत त्यांनी तब्बल ९६ लाखांचा घोळ करत ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी फसलेल्या २४ ग्राहकांनी पुढे येवून हा घोटाळा पुढे आणत चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनंतर या पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गुन्हा दाखल होताच ते पती-पत्नी चिपळुणातून गायब झाले होते. त्या दोघांचा पोलीस शोध घेत असतानाच ते पुणे-हवेली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना सोमवारी अटक करण्यात आली.

यापूर्वीच मंडणगड तालुक्यातही अशा स्वरूपाचा एक प्रकार समोर आला होता. एस. एम. ग्लोबल नामक कंपनीने जवळपास साठ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी मंडणगड येथील संशयित असलेल्या एका स्वीकृत नगरसेवकासह अन्य दोन जणांना मंडणगड पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील तक्रारी आता सव्वा कोटी रुपयांपर्यंत फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्या आहेत. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment