विदर्भ

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत धुळ्यात स्वच्छता रेस

धुळे – महानगरपालिके तर्फे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आज सकाळी पोलीस मुख्यालय येथून धावता धावता कचरा उचलण्याचा उपक्रम करण्यात आला. यावेळी धुळे शहरातील विविध वेगवेगळ्याभागातून विद्यार्थी, पोलीस, मनपा कर्मचारी, नागरिक, वेगवेगळ्या संस्था यांच्या मदतीने शहरातील विविध भागातून धावतावता कचरा उचलण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी सकाळी स्वच्छता रेसचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता रेसची धुळे मुख्यालय परिसरातून सुरुवात करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी हिरवा झेंडा दाखवत या स्वच्छता रेसला सुरुवात केली होती. या स्वच्छता रेसमध्ये, धावताना रस्त्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनासह धुळे शहरातील अनेक संघटनांचे पदाधिकारी विद्यार्थी एनसीसी विद्यार्थी अनेक अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, ब्रँड ॲम्बेसेडर मृणाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वच्छता हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असून, यात सर्व महाविद्यालयीन युवक-युवती, सामाजिक संस्था, गुडमॉर्निंग क्लब, तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी- कर्मचारी व स्वच्छताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित त्यांना स्वच्छते विषयी शपथ देखील दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment