विदर्भ

धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट

धुळे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले असून राज्यातील विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.

संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्वात जिल्हा रुग्णांलयात मोकड्राईल पार पडले. धुळे जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३५ आयसोलेशन बेड ४५६ ऑक्सिजन बेड १७० आयसीयू बेड तर १२३ व्हेंटिलेटर असे एकूण ११६९ बेडची तयारी पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा मंदावलेला वेग लक्षात घेता लसीकरण वाढविण्यासाठी देखील आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. बुस्टर डोस घेण्यासाठी देखील नागरिकांना आवाहन करण्यात येत असून कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपयोजना राबविण्यात येत असल्याची माहिती धुळे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment