धुळे – शहर परिसरात आज सकाळी किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. रविवारी पेक्षा आज किमान तापमान ५ अंश इतके नोंद झाले आहे. त्यामुळेच धुळेकर वाढत्या थंडीने चांगलेच गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहराचे किमान तापमान रविवारी ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले होते. शनिवारी किमान तापमान ७ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून धुळे शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कमीत कमी तापमान ७ अंश नोंद झाले होते. त्यानंतर पुन्हा सातत्याने तापमानात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट होत असल्याने धुळेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. असे होते आठवड्याभराचे किमान तापमान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.