धुळे – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारत बौद्धमय करण्याच्या विचाराला चालना देण्यासाठी धुळे शहरातील अजिंठा बुद्ध विहार आणि मेडिटेशन संस्थेतर्फे सात मे रोजी बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच तब्बल वीस हजार लक्ष नागरिक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दलित, मागासवर्गीय यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रात डावले जात आहे. आमचे कोणताही धर्म अथवा जातीशी वैर नाही, परंतु काही लोकांकडून जातीय द्वेष पसरला जात आहे. दलितांसह मागासवर्ग यांना सुरक्षा आणि शांतता पाहिजे आणि ती फक्त तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच मिळू शकेल या विश्वासातून भारत बौद्धमय करण्यासाठीच्या विचाराला चालना देण्यासाठी धुळे शहरात ७ मे रोजी बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजित करण्यात आले आहे.
हा सोहळा धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यासाठी देश-विदेशातील बौद्ध भिकू यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य बौद्ध धम्मदीक्षा सोहळा साठी धुळे जिल्ह्यातील खेडोपाडी जाऊन जनजागृती ही केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली सर्व धर्मासाठी हा दीक्षा सोहळा खुळा ठेवणार आहोत काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू असल्याची देखील माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी आनंद लोंढे, प्राध्यापक डॉ. नागसेन बागुल, किरण गायकवाड, शंकर खरात आदी उपस्थित होते.