कोल्हापूर – नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोल्हापूर शहराला भेट देत असतात त्यामुळे शहरातील गर्दीवर नियंत्रण तसेच यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलीय. तसेच या काळात हुल्लडबाजी टाळण्यासाठी ड्रिंक आणि ड्राईव्ह कारवाईसह काही ठिकाणी कोंबिग ऑपरेशन देखील करण्यात येणारं असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान दाजीपूर हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी ३१ डिसेंबर ते एक जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे अशी माहिती अभयारण्य क्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली. ३१ डिसेंबर चे औचित्य साधून दाजीपूर अभयारण्य तसेच राधानगरी परिसरातील राऊतवाडी हसणे करी वडे यासारख्या अनेक पर्यटन स्थळांना हौशी तरुण पर्यटक भेट देत मद्यपान करून पार्टी व हुल्लडबाजी करतात. त्यामुळे पर्यावरणाला वन्यजीवांना तसेच आश्रयस्थळांना धोका पोहोचतो. म्हणूनच या कालावधीमध्ये अतिउत्साही पर्यटकांकडून अभयारण्य क्षेत्रातील अनेक ठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी वन आणि पोलीस प्रशासनातर्फे दाजीपूर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .