डोंबिवली – कल्याण ग्रामीण भागातील खोणी सकाळी गावाजवळ भल्यामोठ्या गव्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे. नंतर तो आता अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ परिसरात गवा पाहायला मिळाला आहे. तेव्हा डोंगरावर गुरे चरायला शेतकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. दरम्यान हा गवा कुठून आला? कळपा पासून लांब झाला का? याचा शोध वनविभाग घेत आहे. मलंगगड परिसरात नैसर्गिक अधिवास चांगला झाल्याने तो या भागात फिरत असल्याचं वन अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे.
कल्याण ग्रामीण भागातील खोणी सकाळी गावाजवळ भल्यामोठ्या गव्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले. याचा व्हीडिओ ग्रामस्थांनी काढला असून बरेच वर्षानंतर गवा दिसल्याने वन्यप्रेमी खुश झाले आहेत. मात्र मलंगगड लागून असलेल्या मांगरूळ डोंगरावर त्याने पुन्हा दर्शन दिले. मात्र तिथे काही शेतकरी आपली गुरे आणि म्हशी चरायला घेऊन गेले होते. गवा पाहताच शेतकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र त्या गव्याने कोणत्याही गुराला त्रास दिला नाही. उलट त्या गुरांच्या आणि म्हशी कळपातून जाताना दिसला. साधारण २५६ दिवसापूर्वी बदलापूर ग्रामीण भागातील बेंडशीळ, चिकण्याची वाडी परिसरात गवा पाहायला मिळाला होता, हा गवा कळपापासून वाट चुकून या भागात आल्या असल्याचं वन अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. दरम्यान तोच गवा हा असावा असे म्हटले जात आहे.
सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये गव्याचे कळप आढळून येतात, त्यातीलच हा एक नर गवा चुकून कळपा पासून बाजूला होऊन या भागात आला आहे. या आधीही दोन वर्षांपूर्वी मुरबाड परिसरात गवा दिसला होता. नर गवा हा कळपा पासून जरा वेगळ्या रहात असल्याने कधी कधी वाट चुकल्याने तो भटकतो, असाच वाट चुकून हा गवा या परिसरात आल्या असल्याचं वन अधिकार्यांचे म्हणणे आहे, आम्ही या गव्यावर लक्ष ठेवून असून तो पुन्हा हा कळपात सामील होईल वनाधिकारी यांनी सांगितलं आहे.