पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन

डॉ. अमोल कोल्हे यांची उपरती

व्हीडिओद्वारे करणार गांधी विचारांचा प्रसार

पुणे, ता. 30: 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल आळंदी येथे जाऊन इंद्रायणी नदीच्या काठी महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जन केलेल्या ठिकाणी असलेल्या स्मारकाला अभिवादन केले. आज महात्मा गांधी यांचा 74वा स्मृती दिन त्यानिमित्ताने पूर्वसंध्येला आदरांजली वाहून चित्तशुध्दी सत्याग्रह केला. यावेळी आपली भूमिका मांडणारा एक व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

त्यामध्ये डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, 2017 मध्ये माझ्याकडून अजाणतेपणे एक कृती झाली आहे. मात्र व्यक्तिगत आयुष्यात मी कधीही गांधी विचारांचा विरोधक नव्हतो, नाही आणि नसेन. उलट मी नथुरामची भूमिका केली आहे हे पाहून समाजातील मोठ्या गटाने विशेषतः युवकांनी याबद्दल व्यक्तिशः माझ्याकडे नाराजी व्यक्त केली.

हा गांधीजींच्या विचारांचा विजय आहे. ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. लोकांनी मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत स्वीकारले पण नथुरामच्या भुमिकेत स्वीकारू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. या लोक भावनेचा मी आदर करतो.

लवकरच गांधी विचारांच्या प्रसाराबाबत व्हीडिओ काढून मी माझी भूमिका लोकांसमोर आणणार आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका साकारलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी ‘चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला. यावरून मोठे वादंग उठले.

गांधी वादी, पुरोगामी व्यक्ती, युवा पिढी यांच्याकडून त्यांना मोठा विरोध झाला. त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग झाले. तेव्हा ही डॉ.कोल्हे यांनी यूट्यूब व्हीडिओ द्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.पण तो कोणाला फारसा पटला ही नव्हता.

राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाच्या खासदाराने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या व्यक्तीची भुमिका करून त्या व्यक्तीला नायक म्हणून पुढे आणणे आणि त्याचे गौरवीकरण करणे ही बाब रूचली नव्हती.

समाज माध्यमातून याला मोठा विरोध झाला होता. यानंतरच डॉ. कोल्हे यांना आत्मशुध्दी आणि गांधी विचार प्रसाराची उपरती झाली आहे.

पण जो हौद से जाती है… वो बूँदसे नही आती

हे त्यांना कोण सांगणार? 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment