पश्चिम महाराष्ट्र

मराठी माणूस वाचतो म्हणून माझी पुस्तके मराठीत आणण्यात मला आनंद मिळतो- डॉ.किरण बेदी

कोल्हापूर – ‘मेहता पब्लिशिंग हाऊस ‘ तर्फे प्रकाशित डॉ. किरण बेदी लिखित व सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेल्या “निर्भय प्रशासन” व “नेतृत्व निर्मिती” या दोन नव्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ किरण बेदी वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. हा प्रकाशन सोहळा १० जानेवारी २०२३ रोजी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ किरण बेदी यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी वाचन प्रेमींना मिळाली .या कार्यक्रमाला अनुवादक सुप्रिया वकील, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी व मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अखिल मेहता उपस्थित होते.

डॉ बेदींनी याप्रसंगी त्यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्याला मिळालेली जबाबदारी आपण तनमन धनाने निभावायला हवी पुदुच्चेरीचा विकास घडवण्यासाठी मला जे जे करावे लागलं ते सर्व मी केलं फक्त सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आम्ही विकासाचा मार्ग निर्माण केला असे त्यांनी सांगितले. डॉक्टर बेदींच्या पुस्तकांचा अनुवाद करणं हे अतिशय आव्हानात्मक असतं त्यांचं व्यक्तिमत्व अनुवादात उतरवताना भाषेपासून संदर्भांपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते असे अनुवादक सुप्रिया वकील यांनी सांगितले. याप्रसंगी श्री सुनील मेहता यांच्या स्मरणार्थ मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे सन २०२४ पासून दिल्या जाणाऱ्या प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्काराची घोषणाही करण्यात आली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment