विदर्भ

डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज जयंती

अमरावती – भारत मातेच्या पोटी या पुण्यभूमीत अनेक थोर हुतात्मे आणि महामानव जन्मला आलेत. या महामानवांनी समाजाच्या प्रगती करिता स्वतःला झिजवले असून देश आणि राष्ट्राकरीता जीवन समर्पित केले आहे, असेच भारत मातेचे थोर सुपुत्र ,स्वतंत्र भारतचे पहिले कृषिमंत्री, भारतीय घटना समितीचे सदस्य, शिक्षणमहर्षी, आधुनिक भगीरथ अश्या अनेक पदवीने सन्मानित असलेले माननीय डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांची आज जयंती. सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या जवळ जाऊ शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन स्वतःच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावरील तोडगा एखादया प्रकल्पाच्या स्वरूपात सादर केला , तर मात्र ते अधिक परिणामकारक होऊ शकेल, असा मंत्र त्यांनी शेतकरी वर्गाला दिला. आज या महामानवाची १२४ वी जयंती उत्सव संपूर्ण देशभर साजरी केली जात आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment