कोंकण महाराष्ट्र

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार

सिंधुदुर्ग – मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा बळीराम गवस ( ३५, सध्या रा. मळगांव मूळ रा. सासोली हेदूसवाडी दोडामार्ग )असे त्याचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. या अपघातात ते जागीच कोसळले व गंभीर इजा झाली. स्थानिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अपघाताची माहिती मिळताच मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेला पाचरणे केले मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

कारचालक राहील जहिर दादला ( अंधेरी मुंबई ) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, उपनिरीक्षक अमित गोते, हे. कॉ. डी.व्ही. नाईक यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला. कृष्णा गवस हे शिक्षक होते. मूळ दोडामार्ग येथील असलेल्या गवस यांनी काही वर्षांपूर्वीच मळगाव येथे घर बांधले होते. कुडाळ वरून मळगाव च्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून पंचनामा सुरू आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment