विदर्भ

दुधलम ग्राम पंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत

अकोला – तालुक्यातील राजकीय दुष्या अतिशय महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या दुधलम ग्राम पंचायत ची निवडणूक ४ जानेवारी रोजी ग्राम पंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदाकरीता शंकरराव महल्ले यांना विजयी केले. अतितटिच्या निवडणुकीत सरपंच प्रज्ञा पंडीत, ग्रा.पं. सदस्या विजया महल्ले, मायावती पंडीत यांनी शंकरराव महल्ले यांची बाजू ठामपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मांडुन धरल्यामुळे उपसरपंच पदांची माळ शंकरराव महल्ले यांच्याच गळ्यात टाकण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी देशमुख, ग्रामसेवक अवधुत, तलाठी सुनिल कल्ले , पो पां.नंदकिशोर महल्ले, यांनी काम पाहिले तर पिंजर पो.स्टे.चे ठाणेदार व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment