मुंबई

क्षुल्लक कारणावरून केला चाकूने हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

नवी मुंबई – शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हाचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी चांगलेच मनावर घेतलेले पाहायला मिळत आहे. मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक देखील करण्यात आले. तरी सुद्धा नवी मुंबई मध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून गुन्हे घडत आहे. शिरवणे विभागामध्ये पाण्याच्या नळावरून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाण्याचा नळ सोडला म्हणून घरमालकाच्या मुलाने घरात घुसून फिर्यादीच्या आईचा गळा दाबला. आईचा गळा दाबताना पाहून फिर्यादीने अडवण्याचा प्रयत्न केला असता, घरमलकाच्या मुलाने फिर्यादीवर चाकूने हल्ला करून फरार झाला. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे

नवनीत जैस्वार हे आपल्या कुटुंबासह शिरवणे गावात काही वर्षापासून राहत आहेत. १५ जानेवारीला नेहमी प्रमाणे कामावरून थकून आल्यावर ते झोपी गेले. मात्र रात्री साडेनउच्या सुमारास जोरजोरात आरडा ओरडा ऐकायला आल्याने त्यांना तुरंत जाग आली. त्यावेळी घरमालकाचा मुलगा करण सुतारने नवनीतच्या घरातील सदस्यांना मारहाण करीत असून शेवटी आईचा गळा हाताने आवळून धरला असल्याचे निदर्शनास आले. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने खिशातील चाकू काढून नवनीत यांच्या गळ्याखाली, आणि कपाळावर चाकूचे वार केले. चाकूने वार झाल्यामुळे रक्तभंबाळ झालेला पाहताच किरण पळून गेला. या सर्व घटनेबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जैस्वार ज्या ठिकाणी राहतात त्या इमारतीच्या टाकीचा नळ फिर्यादी यांचा चुलत भाऊ कौशल याने सुरु केला होता. त्याचा राग किरण सुतार याला आला होता. एवढ्या क्षुल्लक कारणावरून किरण याने रात्री घरात घुसून मारहाण आणि चाकूचे वार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment