कोंकण महाराष्ट्र

कवयित्री सरिता पवार यांना दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांना रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत अहमदनगर च्या मराठी विभागाच्या वतीने दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ३ जानेवारी रोजी कर्जत अहमदनगर येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरिता पवार यांच्या साहित्य लेखनामधील आणि वैचारिक प्रबोधनातील योगदान लक्षात घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे ३ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. संससदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, साहित्यविषयक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके ( सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा ) , निमंत्रक आमदार रोहित पवार ( सदस्य जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा ) , संयोजक प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी केली. संमेलन उदघाटन नंतर राज्यातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन संपन्न होणार असून सरिता पवार या निमंत्रित कवयित्री म्हणून कविता सादर करणार आहेत.या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment