मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर विरुद्ध चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो ने दिली धडक
महामार्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद
मुंबई – राज्यातील प्रसिद्ध मराठी वृतवाहिनी महाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉ रोहन भेंडे हे आज दुपारी पुणे ते मुंबईया एक्सप्रेसवरून मुंबई येथे वैयक्तिक कामाने जात असताना अचानक विरुद्ध व चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधावं टेम्पोने कारला जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते तर कारचालक डॉ रोहन भेंडे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
मुख्य मार्गावर टेम्पो चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत असताना डॉ भेंडे यांच्या कारवर येऊन धडकला अपघात भीषन असल्याने टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर प्रश्न असा उपस्थित होतो की विरुद्ध दिशेने आपला मार्ग सोडून हा टेम्पो आला कसा याबाबत संशय व्यक्त केल्या जात आहे. रस्ता चौपदरी असताना विरुद्ध दिशेने प्रवास करणे हे कायदेशीर गुन्हा असून सुद्धा वाहन चालक नियमांचे पालन करीत नसल्याने अनेक अपघात घडतं असतात. मात्र महामार्ग पोलीस यांचे अशा प्रकाराकडे कायमची दुर्लक्ष असते का ? पोलिसांची चिरीमिरी ही प्रवास करणाऱ्या सामान्य वाहन चालकांना कायमची डोकेदुखी ठरत आहे का ? अशी प्रश्नांची मालिका आहे. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी मूळ प्रश्न असा आहे की उलट्या बाजूने चौपदरी रस्त्यावर वाहन चढत असताना नेमके महामार्ग पोलीस यंत्रणा काय करत होती? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. तर त्यां पसार झालेल्या टेम्पो चालकाला पोलीस शोधत असल्याचं वृत्त आहे.