पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर मिरज मार्गावरील आठ पॅसेंजर रेल्वे रद्द

कोल्हापूर – मिरज-कोल्हापूर मार्गावर धावणार्‍या १० पैकी आठ पॅसेंजर रविवारी (दि.१८) रद्द करण्यात आल्या आहेत. रुकडी स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम करण्यात येणार आहे. याकरिता घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पहाटे सुटणारी पुणे-कोल्हापूर आणि रात्री येणारी सांगली-कोल्हापूर पँसेजर वगळता दिवसभरातील पॅसेंजर रविवारी धावणार नाहीत. दरम्यान, कोल्हापूर स्थानकातून सुटणार्‍या आणि स्थानकात येणार्‍या सर्व एक्सप्रेस गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment