मनोरंजन महाराष्ट्र राजकारण

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतदार यादीतून अनेक सभासदांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
या याचिकेवर आता पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी नंतर घेतली जाणार आहे अशी माहिती adv युवराज नरवणकर आणि राजे भोसले यांनी दिली. न्यायालयाच्या या आदेशामुळे महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात सभासदांची नावे वगळल्यानंतर याचिका दाखल केली होती.

सभासदांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवार १८ जानेवारी रोजी सुनावणी झाली न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाची प्रक्रिया ही स्थगित ठेवण्यात आली आहे. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यासह काही सभासदांनी हस्तक्षेप याचिका दाखल करताना महामंडळाच्या निवडणुकीला स्थगिती न देता या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी अशी विनंती केली. मात्र याला न्यायालयाने नकार देत सुनावणी बारा फेब्रुवारी नंतर घेणार असल्याचे सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment