पश्चिम महाराष्ट्र

वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणा विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पंढरपूर – वीज वितरण कंपनीकडुन खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याला वीज वितरण कंपनीच्या संघर्ष समितीने विरोध केला आहे. तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने ७२ तासाचा संप पुकारला आहे. सोलापूर जिल्ह्यात ठीक ठीकानी आंदोलनाला सकाळ पासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अदानी गो बॅक गो बॅक, खाजगीकरण रद्द करा रद्द करा अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे एमएसईबी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहे. तसेच पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या ७२ तासाच्या आंदोलनात तोडगा निघाला नाही तर १८ जानेवारी पासून बेमुदत संप करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment