विदर्भ

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उतरले रस्त्यावर

धुळे – वीज वितरण कंपनीच्या खाजगीकरणाला विरोध करीत राज्यभरातील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ७२ तासांच्या संपावर उतरले आहेत. धुळे जिल्ह्यात जवळपास ८०० कर्मचारी संपावर उतरले असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील जवळपास दहा ते पंधरा वीज उपकेंद्रांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आजपासून ७२ तासासाठी संपावर गेले आहे. वीज वितरणचे कर्मचारी उपोषणावर गेल्याने याच्या सर्वाधिक धुळे जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. वीज वितरणच्या कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह खासगीकरणा विरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी आज पासून संप पुकारला आहे.

धुळे जिल्ह्यातील दहा ते पंधरा वीज उपकेंद्र बंद झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. आपल्या विविध मागण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील साक्री रोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू केले असून, आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी अदानी गो बॅक, विद्युत कंपनीत होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवा अशा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार आंदोलन केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment