मनोरंजन

Lata Didi Passes away I गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन I

Empress Lata Mangeshkar passes away

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

भारताची स्वरलता कायमची अबोल

वडिलांकडून आलेला स्वरवारसा जपत वयाच्या 13 व्या वर्षी पाश्र्र्वगायनाच्या मंचावर पाऊल टाकणारया आणि गेली सात दशके भारतीय संगीतक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 

लता मंगेशकर यांच्या निधनाने मराठी, हिंदींसह देशातील 40 भाषांमधील सुरेल आवाज काळाच्या पडदय़ाआड गेला. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेली 27 दिवस सुरू असलेल्या शर्थीच्या उपचारांशी झुज अखेर संपली. 

संगीतक्षेत्रात दीदी या नावाने ओळखल्या जाणार्‍या लता मंगेशकर यांच्या पश्चात ब्ंधू गायक संगीतकार हृदयनाथ, भगिनी प्रख्यात गायिका आशा भोसले, मीना खाडीकर मंगेशकर, उषा मंगेशकर, भाची गायिका राधा मंगेशकर, भाचे असा परिवार आहे. 

9 जानेवारी रोजी लतादीदी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील पेडररोडवरील प्रभुकुंज या दीदींच्या निवासस्थानी येणार्‍या कर्मचार्‍यांपैकी एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यातूनच लतादीदी यांना 8 जानेवारीला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. उपचारासाठी दीदींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांची टीम उपचार करत होती. 11 जानेवारीपर्यंत दीदींची प्रकृती चिंताजनक होती. मात्र त्यानंतर दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. 20 जानेवारीपासून पुन्हा दीदींची तब्येत बिघडली मात्र आठ दिवसांच्या उपचारांनंतर 28 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती सुधारली तसेच त्यांचे व्हेटीलेटर काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात त्यांना रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात येणार होता. मात्र 5 फेब्रुवारीला दुपारनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले होते. लता मंगेशकर यांच्या असंख्य चाहते त्या सुखरूपपणे घरी याव्यात यासाठी प्रार्थना करत होते, अखेर दीदींनी अखेरचा श्वास घेतला.


वयाच्या 13 वर्षापासून लता यांनी संगीतक्षेत्रात पाऊल टाकले. वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले तेव्हा मंगेशकरांचे स्नेही व नवयुग चित्रपट कंपनीचे मालक – मास्टर विनायक यांनी लता यांच्या परिवाराची काळजी घेतली. 

त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लता यांनी नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लता यांना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. 

ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईला झाले, तेव्हा लता या मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. 

त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले. लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या बडी माँ या पहिल्या हिंदी चित्रपटात १९४५ साली नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लता यांनी माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या सुभद्रा या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी लता यांची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली


१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लता या अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.
१९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर हे लता यांचे मार्गदर्शक बनले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), यासारख्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. 

ग़ुलाम हैदर यांनी लता यांची ओळख तेव्हा शहीद या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशीधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लता यांचा आवाज “अतिशय बारीक” म्हणून नाकारला. तेव्हा हैदर यांना राग आला. हैदर यांनी लता यांना मजबूर चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असत पण नंतर लता यांनी स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लता यांच्या हिंदी गाण्यातील “मराठी” उच्चारांसाठी डाळभात असा शेरा मारला तेव्हा लता यांनी शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले व उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1947 साली महल या सिनेमातील आयेगा आनेवाला हे गाणे लता यांच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. त्यानंतर सहा दशके लता यांच्या स्वरांनी हिेंदीसह 40 भारतीय भाषांमधील गाण्यांच्या माध्यमातून मोहिनी घातली.

लता मंगेशकर यांचा जीवनपट

  • लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोर येथे झाला
  • वडीलांचे नाव पंडित दीनानाथ तर आईचे नाव शेवंती असे होते
  • वडील दीनानाथ यांच्याकडून लता मंगेशकर यांना संगीताचे बाळकडू मिळाले
  • लता मंगेशकर यांचे मूळ आडनाव हर्डिकर असे आहे
  • परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलुन आपल्या मुळ गावावरून ते मंगेशकर असे केले.
  • लता यांचे लहानपणी नाव हेमा होते, मात्र भावब्ंधन नाटकातील लतिका हे नाव त्यांच्या वडीलांना आवडले त्यावरूनच त्यांचे नाव बदलून लता असे ठेवण्यात आले
  • लता यांच्या जन्मानंतर मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाले
  • लता या मंगेशकर कुटुंबातील मोठे अपत्य होत्या
  • लता यांच्यासह आशा, मीना, उषा व हृदयनाथ या भावंडांनी संगीतक्षेत्रात योगदान दिले

वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी या स्वरसम्राज्ञीने शास्त्रीय संगीताची मैफिल सजविली होती.

लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान, बडे़ गुलाम अली खान,पंडित तुलसीदास शर्मा व अमानत खान देवसल्ले यांच्याकडून घेतले होते.

1942 ला लता यांच्या वडीलांचे निधन झाले

वयाच्या 13 वर्षी लता मंगेशकर यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली
किती हंसाल (इ.स. १९४२) या मराठी चित्रपटासाठी पहिले गीत गायले
1947 साली महल या सिनेमातील आयेगा आनेवाला हे गाणे लता यांच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले.

लता मंगेशकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके

  • लता (इसाक मुजावर)
  • लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
  • लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
  • The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : ‘अक्षय गाणे’ जयश्री देसाई)
  • ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
  • लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
  • लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : ‘लतादीदी’ अशोक जैन.)
  • In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी – हरीश भिमाणी)
  • Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
  • लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
  • लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) – संपादन : विश्वास नेरूरकर
  • गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
  • हे रत्‍न भारताचे – लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
  • मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
  • संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
  • सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
  • लता मंगेशकर – संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या.

लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती.

तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment