रत्नागिरी – राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव व बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदास भाई कदम यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची आज एंन्ट्री होणार आहे. रामदास कदम यांची खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नांदगाव येथे ते आज १२ जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात ते भास्कर जाधव यांच्याबाबत रामदास कदम काय बोलण्याची शक्यता असून ते काय बोलणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग हा आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात येतो.
यापूर्वी दापोली येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनी रामदासभाई कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. रामदास भाई कदम यांनी शिवसेना विरोधात काम केले होते असाही थेट आरोप त्यावेळी भास्कर जाधव यांनी त्यावेळी सभेत केला होता. परंतु त्याला उत्तर दिले होते लवकरच मी मतदार संघात जाऊन त्याला उत्तर देईन असे रामदास भाई कदम त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर आता गुहागर मतदारसंघात येत असलेल्या खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात रामदास कदम यांनी थेट जाहीर सभा ठेवली आहे या सभेला एकदा शिंदे गटाचे नेते म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम मार्गदर्शन करणार आहेत आमदार योगेश कदम हेही यावेळी उपस्थित असणार आहेत. यापूर्वी याच गुहागर मतदारसंघातून रामदासभाई कदम यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. विनय सेनेचे भाजपाचे तत्कालीन बंडखोर उमेदवार डॉ.विनय नातू व राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांच आव्हान होते. त्या निवडणुकीत रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला होता.