आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीत फसलो, फसवणुकीचा बदला घेणार : आ. जयंत पाटील
तटकरेंना जयंत पाटलांचा टोला,
रोहा : रविंद्र कान्हेकर
आम्ही जमिनीची दलाली केली नाही, ज्यांनी केली त्यांच्याकडे कुठून पैसे आले याची चौकशी मात्र लावणार असल्याचे आ. जयंत पाटील म्हणाले.आता कामांचा दहा टक्के भाव चालू आहे.

यांना मोठे करण्याचे पाप मी केले, ही माझी चूक झाली. तरीसुद्धा कार्यकर्ते मला म्हणाले होते, भाई तुम्हाला पश्चाताप होईल तरी सुद्धा चूक केली यापुढे अशी चूक होणार नाही. आम्हाला आगोदर माहीत असते तर आम्ही निवडणुकीची तयारी वेगळ्या पद्धतीने केली असती.
यशवंताखार मधील माझी जिल्हापरिषद सदस्य नंदूशेठ म्हात्रे व माजी सभापती लक्ष्मण महाले यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला.
मेढा येथील हायस्कुलच्या प्रांगणात हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा शुक्रवारी 8 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडला. यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील, रोहा तालुका अध्यक्ष राजेश सानप, चिटणीस जितेंद्र जोशी, जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत, रमेश मोरे, आरडीसी संचालक गणेश मढवी, माजी सभापती गुलाब वाघमारे, हेमंत ठाकूर, माजी उपसरपंच बाळा भोईर, भातसई सरपंच गणेश खरीवले, प्रसाद भोईर, जीवन देशमुख आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले कि,
रायगड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा सीलसीला सुरू राहणार आहे, यासाठी मी स्वतः फिरणार आहे.
आजचा दिवस पक्षवाढीसाठी कलाटणी देणारा ठरणारा आहे. नंदू म्हात्रे आणि लक्ष्मण महाले शेकाप मध्ये आले,अश्या कित्येकांशी माझी चर्चा चालू आहे.मी कधी गद्दारी केली नाही.
धैर्यशील पाटील जरी आज आमदार नसले तरी त्यांच्या वडिलांपेक्षा मते त्यांना पडली होती. आज पक्षप्रवेश झाला असे बरेच महाले आणि म्हात्रे आपल्याकडे येतील. मी महाले व धैयशील यांच्यावर हा तालुका बांधणीची जबाबदारी देतो. आम्ही मंत्री व खासदार नाहीत पण आमची वाणी काम करणारी आहे कुणाला फसवणारी नाही.
माझे कार्यकर्ते माझ्या घरचे सभासद मानणारा मी असल्याने कार्यकर्ते आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. मला कार्यकर्ते म्हणाले होते तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होईल आणि तरीही मी
आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीत फसलो याचा बदला मी घेणार असल्याचे वक्तव्य शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
सत्ता असेल तिकडे लोक धावतात, मात्र आज थोडे आकरीत घडले आहे महाले व म्हात्रे सारखी माणसे येतात तेव्हा शेतकरी कामगार पक्षाला भवीतव्याबाबतआशा निर्माण होते. हांड्डी फोडायची असेल तर चढाओढीनेफोडावीच लागते. मैत्रीचे वेगवेगळे प्रकार आम्हाला अनुभवायला मिळाले.आम्हाला काय माहित मैत्रीचा अर्थ फक्त निवडणुकीपुरताच असतो.शेतकरी कामगार पक्षाच्या संकटकाळी राष्ट्रवादीचे धुरंदर नेते शेकाप मध्ये आले. आमची वाट भरावश्याची आहे, हे आम्हाला प्रवेश करून दाखवून दिले. : माजी आमदार धैर्यशील पाटील
आ. अनिकेत तटकरे हे मेढ्याच्या सभेत म्हणाले होते ज्येष्ठांची कामे मी करत नाहीत, तरुणांची करतो असे म्हणाले. निष्ठावंताना डावलले जात होते. माझ्यामुळे झालेला शेकापचा पराजय भरून काढू. : माजी सभापती लक्षण महाले
तटकरे कुटुंबियांपेक्षा आम्हाला शेकाप पक्ष परवडेल. मी माणगाव रोहा मतदार संघाचा अध्यक्ष झाल्यावर आमच्या भागातील विकास कामे करण्याचा प्रस्ताव मी खा. सुनील तटकरे यांचाकडे ठेवला. त्यातील एकही काम केले नाही. आ.अनिलभाऊ तटकरे व आ. अवधूत तटकरे यांच्या वेळी राष्ट्रवादी मध्ये कार्यकर्त्यांना जो मान होता तो आता मिळत नाही. : नंदूशेठ म्हात्रे