अमरावती – महापुरुषांचा जिल्हा म्हणून परिचित असणारा अमरावती जिल्हा आता महाराष्ट्र शासनाच्या अवयव दान चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रीन कॉरिडोर दरम्यान एका ब्रॅण्डेड महिलेने आपले तीन अवयव दान करत मरावे परी कीर्तिरूपे उरावे हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे.
जिल्ह्यातील परतवाडा येथील 65 वर्षीय महिला बिना खटवानी या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांना अचानक हात पायाची हालचाल करत नसल्याने त्यांच्या परिवार जणांनी त्यांना अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टर सिकंदर हरवानी यांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या आणि त्यातून त्यांच्या मेंदूतील तीन नस चोकप असल्याची माहिती समोर आली. दोन दिवस हातापायाच्या हालचाली न केल्याने डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्या पूर्णतः कोमात गेल्या असून त्या बाहेर येण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहिती दिली यावर डॉक्टर सिकंदर अडवाणी यांनी त्यांना अवयव दान या संकल्पनेविषयी समजून सांगितले त्यावेळी बिना खटवानी यांचा मुलगा विकी खटवानी यांनी परिवाराला विश्वासात घेऊन ब्रॅण्डेड झालेल्या आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि क्षणातच कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली.
डॉक्टर सिकंदर अडवाणी यांच्याकडून झोनल ट्रान्सप्लांट कमिटीला कळविण्यात आले. ही समिती रुग्णालय दाखल झाली आणि त्यांनी ब्रिडेंट झालेल्या महिलेची एफनिया टेस्ट केली या टेस्ट मधून तथ्य समोर आल्यानंतर त्यांनी रात्रभर त्यांचा बीपी मेंटेन केला दुसऱ्या दिवशी पहाटे ऑर्गन डोनेशन ची टीम आली आणि त्यांनी हे अवयव काढलेत. डॉक्टर हरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन किडनी व एक लिव्हर असे अवयव या महिलेने दान केले असून एलेक्सा हॉस्पिटल सावंगी मेघे व नागपूर येथील होक हार्ड हॉस्पिटल येथे या किडनी नोंदणी केलेल्या रुग्णांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने सध्या अवयव दान चळवळ सक्षम करण्यासाठी महत्त्वाची पावली उचलली आहे त्याचीच बीजे अमरावती पडली असून डॉक्टर आणि सामाजिक भान असलेल्या नागरिकांच्या समन्वयातून दिवसागणित अवयवदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.